आयुष हे जगायचे असते
किती आली वाकडी वळणे,
किती आले खड्डे ,
तरी चालायचे असते,
आयुष हे जगायचे असते .
किती आल्या लाटा,
किति आली वादळे ,
तरी झेलायचे असते,
आयुष हे जगायचे असते.
किती आली संकटे,
किती खाल्ले धक्के,
तरी सावरायचे असते,
आयुष हे जगायचे असते.
नशिबाने दिला धोका,
तरी हरायचे नसते,
आयुष हे जगायचे असते.
No comments:
Post a Comment