Pages

Tuesday, February 1, 2011

तोरणगड ट्रेक {प्रचंडगड.}

नमस्कार मित्र हो,
         रविवारी मी किल्ले तोरणा येथे जाऊन आलो. एकदम मस्त ट्रेक झाला माझ्या मित्राबरोबर.?
तोरण्याची माहिती सर्वांना असेलच तरीही जुजबी ओळख करून देतो. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हा गड घेतला. कानद खोर्यातला हा सर्वात उंच किल्ला. ( आणि कदाचित पुणे जिल्ह्यातला सुद्धा..चू.भू.देणे घेणे ) पूर्वी हा किल्ला आदिलशाही अंमलाखाली होता आणि अगदीच दुर्लक्षित अवस्थेत होता. म्हणजे राजांच्या ताब्यात आल्यावरच याचं भाग्य उजळलं असं समजायला काही हरकत नाही. अतिशय उंच आणि बेलाग किल्ला आहे हा. याचं दुसरं नाव प्रचंडगड.
        {तोरणगड}गेले दोन - अडीच महीने सलग काम केल्यावर आत्ता कुठे सुट्टी (म्हणजे कमी काम) चालू झाली आहे.... आणि सुट्टीची सुरुवात परत एकदा एका झकास ट्रेकनी केली आहे. नविन वर्षाचा पहिला ट्रेक आजच { जानेवारी १३,२०११ } दीपकने मला फ़ोन केला होता की आपल्याला { जानेवारी १५ ,२०११ } शनिवारी सकाळी ४ :३०   राजगड ट्रेकला जायचे आहे . दीपक,सुहास.राज हे माझे जुने मित्र आहेत आणि त्यांच्या बरोबर येणारे त्यांचे मीत्र माझ्यासाठी नविनच होते. तरी पण अपेक्षा हीच आहे की सर्व काहि ठीक होइल .मी गडावर कधीही राहिलो नव्हतो.माझ्या  मनामध्ये उत्सुकता आणि अनेक प्रश्नही पडले होते .तिथे  गेल्यावर काय करायचे ?  कोठे रहायचे ? जाताना  आपल्या  बरोबर काय घेउन जायचे ? असे अनेक प्रश्न मला पडले होते.  पहिला  माझा  कधीच  दोन दिवसांचा ट्रेक  झाला नव्हता . हा माझा पहिलाच ट्रेक होता.   त्या प्रमाणे मी माजी सर्व तयारी केलि होती.सुहासने फोन केला की मी सकाळी ४ :३० अंधेरी स्टेशन जवळ येणार आहे.  

        दुसरया दिवशी {जानेवारी१४,२०११ } रात्रि  पुन्हा एकदा  दीपकचा फोन आला. सुहास आणि त्याचे मित्र यांचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून कार्यक्रम थोडा बदला आहे. आपण सकाळी एवजी  दुपारी निघायचे आहे.कालपर्यंत आज ट्रेकला जायचं क नाही हे नक्की नव्हतं (नेहमीप्रमाणेच)... पण शेवटी एकदा आज बाहेर पडायचं हे नक्की झालं. आज दुपारी घड्याळानी पण दगा दिला आणि गजर वाजलाच नाही...पण जाणं जमायचंच होतं बहुतेक, त्यामुळे निघायचं ठरलेल्या वेळेच्या आधी ५ मिनिटं जाग आली..सुहासचा फ़ोन आला कीतो अंधेरी स्टेशन जवळ आला आहे.मग सुपरफास्ट वेगानी आवरलं आणि आमची स्वारी बाहेर पडली. स्टेशनच्या दिशेने निघालो.घड्याळानी दगा दिल्यामुळे मला स्टेशन जवळ पोहोचायला जरा वेळच लागला. सुहास,धुंडीराज,स्नेहल माझी वाट पाहत होते.तिघाना घेउन मी पुढे निघालो.दीपकचे ऑफिस रसत्या मध्येच लागणार होते.दीपक तिथेच उभा होता त्याला घेउन आम्ही पुढे निघालो.आता अजुन तिघेजण यायचे होते.

      दीपकने मला स्नेहलची ओळख करुन दिली आणि त्यांच्या बोलण्य बोलण्य मध्ये मला माहित पडले की आम्ही तोरणगडला चालो आहे.अचानक पणे मला माहित पडले की आल्यला राजगडला नाही तोरणगडला जायचे आहे.मला जरा ही कल्पना नव्हती  की आम्ही तोरण गडला चलो आहे. मी लगेचे दीपकला विचारले की हे खरे आहे का?त्यावर स्नेहल लगेच बोंली अरे हा बघ याला काहीच माहित नाही आणि सर्व जान जोरजोरात हसू लागले .मला काहीच कळेनासे जाले.मग काय आता जायलाच लागणार थोडा निराश झालो होतो पण कुठे तरी जातो आहेना यातच आनंद मानला मागचे सर्व काहि विसरून पुढे येणारे आनंदाचे क्षण वेचायचे ठरविले.आणि त्यांच्या  मधे मिसळुन गेलो.

     वाशीला पोहचल्या वर स्नेहलची फ्रेंड ज्योति येणार होती.तिला यायला उशीर होणार होता म्हणून टाइम पास करण्यासाठी Hypercity mall मधे गेल.गडावर खाण्यासाठी खाकरा,पूरणपोली,बिस्किट,भाकरवडी आणि बरेच काहि दीपक,सुहास  आणि स्नेहल खरेदी करत होते. मी आणि राज असेच फीरत होतो.सर्वाना जोराची भूक लागली होती म्हणून खरेदी झाल्यावर softy corner मधे आलो दीपक आणि सुहास काही तरी ऑर्डर करण्यासाठी गेले.तो पर्यन्त आम्ही India Vs Southafrica क्रिकेट मैच पहात होतो.मला काहि क्रिकेट मधे जास्त रस नाही आहे.पाहिले आवडायचे पण मैच फ़िक्सिग प्रकरणा नंतर मला काहि आवड राहिली नाही.सुहास आणि दीपक आइस्क्रीम घेउन आले मला वाटले होते काहि तरी खायला आणेल मग तोच बोंला की आपले बजेट कमी आहे.

                                                                                                                               


खायला आणले असते तर पैसे कमी पडले असते.यासाठी आइस्क्रीम घेउन आलो आहे.आइस्क्रीम खाऊन होईपर्यंत आम्ही सर्वजण मैच पहात होतो.सचिन खेलत होता म्हणून मी ही पाहत होतो.सचिन आउट झाल्यावर सर्वजण उठून आम्ही पार्किंग च्या दिशेने निघालो.ज्योतिचा ही फोन आला की ती सानपाडा स्टेशन बाहेर वाट पाहत आहे आणि तिलाही पिकप केले आता राहिले दोग जण आनंद आणि दीपकचा भाऊ अक्षय,आनंद नेरुल हायवेला येणार होता.थोडवेळ वाट पहिल्या नंतर तोही आला. अक्षय पनवेल स्टेशन बाहेर वाट पाहत होता.अशा तःरेने  आम्ही सर्वजण एकत्र  आलो.दुपार ची संध्याकाळ झाली आणि आम्ही मुंबई मधेच होतो ७:३० वाजता मुंबई सोडली आणि तोरण गडाच्या दिशेने निघालो.सर्वजण एकमेकाला चिडवत होते तुजा मुले लेट झाले .मी आणि राज त्याची मजा घेत होतो मुंबई पुणे जुन्या रस्त्याने आम्ही जात होतो मला फार भूक लागली होती आणि कुठे ही होटल चालु नव्हते मी मात्र गाढ़ी चालवत होतो.
          
  पुण्याला स्वारगेट डेपो जवळ बुर्जी पाव चाय वाले यांच्या छोट्या मोट्या हात गाड्या चालू होत्या तिकडे आम्ही जरा
 पोटसुख घेतले.मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.पुण्यातिल आतील रस्ते माहित नसल्या करणाने आम्ही अर्धा तास तिकडेच वाया गेला माग विचारत विचारत कसे बसे वेल्हा गावामध्ये  पोहोचलो म्हणजेच तोरण गडाच्या पय्थापाशी.गाड़ी एका लाइटच्या खंबा खाली  उभी केली जास्त गाड्या दिसत नव्ह्त्या त्यामुळे मनापासून खुश झालो. नाहीतर आजकाल गडांवर पण गर्दी व्हायला लागली आहे सिंहगड, लोहगड हे शनिवार-रविवार सुट्टिच्या दिवशी करायचे गड आता राहिले नाहियेत. तोरणा चढताना जरा फाटते या हौशी लोकांची...त्यामुळे जरा गर्दी कमी.
         रात्रीचा एक वाजले होते बाहेर खुप कडाक्याची थंडी पडली होती.प्रथम मी आणि राज गाडीच्या बाहेर पडलो माझ्या मागे सुहास,दीपक,आणि दीपकचा भाऊ हे ही आले.थंडी जास्त असल्या करणाने ज्योति,आनंद,स्नेहल गाडीतून बाहेर पडत नव्हती.आम्ही गडाची वाट शोधत होतो समोरच एक नकाशा दिसला तो गडाचाच होता.तो नकाशा पाहिल्यावर समजले की आम्ही बरोबर आलो आहे. काळी कभिन्न रात्र! थंडीचा कडाका जाणवत होता आणि गावकरिही गाढ़ झोपेत होते.कानांच्या पडद्याचे ढोल करत रातकिड्यांची किरकिर चालु होती चांदणं ही पडले होते .आशा वेळी कोणीतरी गरमागरम चाहा आणून दिला तर बरे होइल असे वाटत होते.पण काहीच होऊ शकत नव्हते.तरी ही सुहास गडाची वाट शोधत शोधत पुढे पुढे जात होता.आमच्या समोर दोन पाय वाटा होत्या पण नेमकी कोणती वाट गडाकड़े जाते याची कुणालाही कल्पना नव्हती आणि कुणालाही विचारूही शकत नव्हतो.यामुळे दीपक म्हणाला की आता जास्त पुढे जाउया नको जंगला मध्ये प्राणी असतील तरी ही सुहास म्हणाला थोडेसे पुढे जाउन पाहुयाना शेवटी दीपकचे ऐकावे लागले.नाइलाजाने मागे फिरावे लागले आणि पुन्हा गाडीच्या दिशेने निघालो.हे सर्व तो वरचा चंदा मामा गुपचुप पाहत होता आणि मजाही घेत होता.गाड़ीकड़े आल्यावर शेकोटीसाठी लागणारी लाकडे शोधू लागलो पण लाकडे सापडत नव्हती मग शेतातील गवत काडून शेकोटी पेटवली हे पाहून गाड़ी मध्ये बसलेले सर्वजण बाहेर आले.पण थंडी जास्त असल्या करणाने त्याचा काहि फायदा होत नव्हता आणि गवत असल्या करणाने ते लवकर जळून जायचे.

           मी राज.अक्षय आणि आनंद ती जळत ठेवण्याचा पर्यत्न करत होतो.   काहिना काहि आणून त्या शेकोटी मध्ये टाकायचो हे सर्व फार काळ टिकले नाही.पुन्हा सर्वजण गाड़ी मध्ये जाउन बसले आता मी राज, अक्षय फक्त बाहेर उभे होतो आणि ५:०० वाजण्याची वाट पाहत होतो.कारण सर्वानी ५:३० ला गड चढ़ायला सुरुवात करायची आहे असे सांगितले होते आणि आम्ही ५:०० वाजण्याची वाट यासाठी पाहत होतो की यांना   उठवायला अर्धा तास लागणार होता.मी पुन्हा घड्याळात पाहिलं. पहाटेचे साडे चार वाजत आले होते.आणि राज बोंला की गाड़ी कुठे तरी चांगल्या जागेवर नेउन लाउया तसा मी ही गाड़ी काढण्यासाठी गाड़ी उघडली बघतो तर पाच मुड्ढे पडले होते सर्वांना उठविले आणि माग गाड़ीची काच साफ़ करायला घेतली कारण सगळे दवबिंदु कुठेतरी लगबगीने गर्दी करून निघाल्यासारखे वाटले म्हणजेच काचे वर पाणी साट्ले होते ते साफ़ केले.गाड़ी एका पोलिस स्टेशनच्या समोर झाडाच्या खाली नेउन लावली थंडीने सर्वजण गारठले होते.माग मलाही कंटाळा आला होता. मी ही गाडीत बसून एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर वळत गाढ झोपी जाण्याचा प्रयत्न केला. नाही जमलं. अर्धवट झोप आणि विचारांची अविरत चालणारी चक्की! शांत झोप लागतच नव्हती.तिथेच बाजूला एका घराचे काम चालु होते.आणि ते काम पूर्ण करण्यासाठी गावातील काहि मंडळी सकाळी सकळी आली होती.सर्वजण गाड़ी तुनच ओरडत होते ५ :०० वाजून गेले चला आता जाऊया.पण गाडीच्या बाहेर पडायला  कोणीही पाहत नव्हते.मग थोड्या वेळाने ज्योति उठली आणि गाडीच्या बाहेर गेली आणि फिरत होती. थोड्या वेळाने परत ती गाड़ीकड़े आली आणि म्हणाली की चाय ची सोय झाली आहे.सर्वांनी लवकर उठा  कुणालाच काहि माहित नव्हते.चाय कोण देणार होते.मला वाटते की तिने ते घर काम करणारे होते त्यापैकी एकला विचारले असावे की इथे कुठे चाय मिळेल का?त्यापैकी एक कुणी तरी तयार झाला असावा.{कारण हे मला पूर्णता माहित नाही आहे}सर्वजण उठून गाडीच्या बाहेर आले .आणि चायची वाट पाहू लागले.एक मनुष्य ज्योति पाशी येउन बोंला की चाय आहे पण दुध कमी आहे.तुम्हाला जमुन घावे लागेल आम्ही तयार झालो .थोडयाच वेळाने तो चाय घेउन परत आला.

चाय नाश्ता करून झाल्या गाड़ी लोक केली अणि   आम्ही गडाच्या मुख्य वाटेला लागलो.सर्वांना सूर्योदय गड़ा वरून पहायचा होता.यासाठी सर्वजण चालतहोते.गडाच्यापहिल्या टप्या पूर्ण होण्या आधीच सुयाचे आगमन झाले
 
                                                    
मग तिथे आम्ही जरा फोटो सेशन केलं.सर्वांना भूक लागल्या मुळे आनंदने घरून आणलेल्या पूरण पोळीवर सर्वजण तुटून पडले आणि पुढच्या वाटेला लागलो.तोरण्याचा पहिल्याच सोंडेवरच्या चढाने आमचे पेकाट मोडत होते.निदान माझं तरी.त्यामुळे माझा वेग जरा कमी होता पण तो पार केल्यानंतर फारशी चढाई नाही.मग आनंद,स्नेहल, राज आणि त्याच्या मागे मी माझ्या मागे सुहास,दीपक,अक्षय,आणि सर्वात शेवटी ज्योति अशी वाटचाल सुरु होती.आता झपाझप चालायला सुरूवात केली आणि थांबायचं नाही असं ठरवलं...पण हा आला आडवा...खूपच छोटा होता.कोणी तरी मरला होता हे बघुन फार वाटले मी त्या उचलून बाजूला केले.  कुणी तरी असतात असे वीर..उगाच एखाद्या जीवाला मारून मर्दुमकी दाखवणारे.
 मग मात्र रस्ता चुकायला फारसा वाव नसल्यानी आम्ही सरळ सरळ चालत मोठ्या चढणीपार केल्या.जस जसे वरवर जात होतो तसतसे निसर्गाचे अनेक सुंदर सुंदर देखावे दिसत होते ते पाहून मनात असे वाटायचे की  इथेच  बसून एकटक पाहत रहावे पण पुढे अजुन काहि पहायचे होते मग पुढे पुढे चालत राहिलो.आता सगळा दगडीटप्पा होता ते चढताना फार त्रास नाही झाला. पण या वाटेवरून नंतर परत उतरायचं आहे हे मात्र राहुन राहुन डोक्यात येत होतं.असेच मजल-दरमजल करत अखेरीस ७:०० सुमारास गडाचा पहिला दरवाजा म्हणजेच बिनी दरवाजा गाठला.आणि तिथे ही फोटो सेशन झाले यामधे माझा काहि फोटो काढत नाही आला कारण सर्वांचे फोटो मीच काढत होतो.{बिनी दरवाजा आणि कोठी दरवाजा}
थोडे पुढे चालल्यानंतर येतो तो "कोठी दरवाजा"  दोन्ही दरवाजे अजुनही आपल्या अस्तित्वाची जाणीव देत उभे आहेत. पटापट फोटो घेत आम्ही पुढे सरसावलो.तिथेच एक ताक वाला ताक घेउन बसला होता मग काय थोडावेळ  बसलो अणि ताक ची आर्डर झाली.गडावर माकड़े फार नव्हती पण जि होती तीच भारी होती.माझी बैग दोन वेळा जाताजाता वाचली.तिथेच एका पाण्याच्या  टाक्यशेजारी "तोरणाईदेवी"छोटेसे एक मंदिर आहे.{हे आहे तोरणाईदेवीचे मंदिर}मोर्चा झुंजार माचीकडे वळवला.झुंजार माचीकडे जायला शिडीवरून खाली उतरून जावे लागते.अर्थात,झुंजार माचीचे दूरदर्शन घेउन पुढे त्याच रस्त्याने आम्ही कोकण दरवाज्याकडे निघालो. .    
निघालो. .{हा आहे कोकण दरवाजा }अजून सुद्लांबच दिसत होता सकाळपासून काहीही खाल्लं नव्ह्तं ते इथेच खाल्लं.हा आहे कोकण दरवाजा इथून राजगड ला जायचा रस्ता आहे. राजगड - तोरणा किंवा तोरणा - राजगड हा एक मस्त ट्रेक आहे पण शक्यतो नवख्यांसाठी नाही. कारण मजबूत चालायचं आहे खरं तर उठून जायचं अगदी जिवावर आलं होतं पण अजुन  खूप काहि पहायचे होते.कोकण दरवाज्यातुन बुधला माचीकड़े कूच केल कोकण दरवाज्यावरून आजूबाजूच्या टापुची टेहेळणी केली .पश्चिमेकड़े दुर्गदुर्गेश्वर रायगड दर्शन देत होता. कोकण दरवाज्यावरून खाली उतरून आम्ही सर्वजण बुधल्याच्या दिशेने निघालो.बुधल्याकड़े जाण्याची  वाट जरा घसरणीची असल्या मुळे ज्योति आणि स्नेहल,दीपक,सुहास,अक्षय पुढे नाही आले.मी राज आणि आनंद बुधल्याकड़े निघालो थोड्याच अंतरावर घसरणीचा रस्ता आला.आनंद व राज कसेबसे खाली उतरले मीही उतरण्याचा प्रयत्न केला पण उतरू शकलो नाही.माझे बूट माझी साथ देत नव्हते.गड उतरून मलाच गाड़ी चालवायची होतीना हेही मना मधे होते.मग काय कोणतीही रिक्स न घेता मागे फिरलो. सर्वांन सोबत आनंद व राजची वाट पहात राहिलो.ते आल्यावर आम्ही सर्वजण मेंगाई" देवीच्या मंदिरा कड़े निघालो.                {बुधला माची, झुंजारमलमाची,दारु कोठार}

 विशाळाटोक, टकमक टोक, चित्ता दरवाजा.. आणि बरेच काही.थोडे वरच्या बाजुला चढुन गेले की एक प्रशस्त मंदिर आहे, "मेंगाई" देवीचे ...{हे आहे मेंगाई" देवीचे मंदिर}

त्याच्या समोर एक छोटेसे .. पडझड झालेले .. बाहेरचा नंदी ते महादेवाचे मंदिर असल्याची साक्ष देत होता.. आतमध्ये एक गणेशाची मुर्तीही आहे बाकी ईतरत्र काही अवशेष पडलेले आहेत .. मेंगाई  देवीच्या देवळात प्रवेश करते झालो .देवदर्शन घेऊन  लगेच शिदोरी सोडण्यात आली.आम्ही पोटातल्या कावळ्यांनाही नैवेद्य देण्याचा तयारीला लागलो.... सोबत आणलेले  ..
पूरणपोळी,खाकर काही बिस्कीटे आणि काही फ़ळे... मस्त ..! पोटाला आधार मिळाला होता.पुन्हा थोडेसे फोटो काढुन आम्ही उतरण्याची तयारी सुरु केली... दुपार झाली होती... सुमारे साडे तिन तास आम्हाला फ़क्त चढाई करण्यास लागले होते..चढाईच्या आठवणीनेच उतरण्याची धास्ती लगली होते.. पुन्हा एकदा देव दर्शन घेऊनआम्ही गड उतरायला सुरुवत केली...चढ़ताना वाटलं होतं तेवढं उतरण अवघड नाही गेलं.मात्र दगडी टप्पा ओलांडून खाली येताना चांगलंच प्रात्यक्षिक पहायला मिळालं.चढाईच्या वेळी रस्ता जरा ओळखीचा झाल्याने पटापट पाउले उचलत आम्ही चालु लागलो परतीच्या वाटेवर अजुनही तो साप त्या दगडावर होता. अगदी निवांत उतरलो .पुन्हा एकदा तोरणा डोळ्यात साठवून घेतला आणि गाडीजवळ पोहोचलो. गरमा-गरम कॉफ़ी जणु आमचीच वाट पहात होते.कॉफ़ी पिउन झाल्यावर परतीचा प्रवास सुरु केला.




                                                                                                                    चू.भू.देणे.घेणे{महेश सावंत }