Wednesday, November 16, 2011
किल्ले विसापूर
पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण हा विसापूर किल्ला करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.
किल्ले हरिश्चंद्रगड
किल्ले हरिश्चंद्रगड
स्थान :
हा किल्ला पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे.
भौगोलिक माहिती :
पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग बालाघाटची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.
पौराणिक महत्व :
हरिश्चंद्र, तारामती आणि रोहीदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे.
गडावर जाण्याच्या वाटा :
सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. त्यापैकी पाचनई कडील वाट आणि खिरेश्वरकडून जाणारी वाट दुर्गप्रेमी मंडळींना सोयीची आहे.खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने तिचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो.
कल्याण -अहमदनगर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होवू शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.
किल्ल्याबद्दल :
हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पुर्व बाजूला इंग्रजी यु आकाराची खिंड होय. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध टोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा होय.
रस्त्यातील व्याघ्रशिल्प पायथ्यापासून टोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेवून जाते. खिंडीतून चढणारी वाटेवर खडकात पायठाण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो. येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या धोपटमार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.पाहण्यासारखी ठिकाणेयेथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.
गणपती,हरिश्चंद्रेश्वर मंदिर मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.
कोंकणकडा :
हरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रुप पहावे लागते. येथून स्वच्छ हवेमध्ये कल्याण पर्यंतचा प्रदेश दिसतो.
हरिश्चंद्रगडावरुन शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरख, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली, अलंग, कुलंग, मदनगड, कलाडगड, भैरवगड (मोरोशी) तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.
गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे.
ऐतिहासिक महत्व
महाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रितील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.
{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
किल्ले हरगड
किल्ले हरगड
इतिहास : इतिहासात फारसा या गडाचा उल्लेख नाही कारण येथे कोणती मोठी लढाई झाली नाही. मुल्हेर गावात गेल्यावर हरगडचे दर्शन होते. समोर दिसणारा मुल्हेर,डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड. या गडाची उंची मुल्हेरपेक्षा थोडी जास्त आहे
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गडमाथा तसा विस्तीर्ण आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. या पठारावर काही तटबंदीचे अवशेष आहेत. पाण्याची दोन टाकी आढळतात. एक पडके मंदिर आहे. वाड्यांचे काही अवशेष आढळतात. पाण्याच्या टाक्यांमधील पाणी पिण्यासारखे नसल्याने पाणी जवळ असणे आवश्यक आहे. गडफेरी मारताना पुढे सपाटीवर एक गुहा आढळते यात कपार भवानीचं मंदिर आहे. बाकी गडावर पाहण्यासारखे काही नसल्याने आल्या मार्गाने खिंड गाठून एक तर मुल्हेरगडावर जावे नाहीतर
मुल्हेर गावात जावे. गडफेरीस १ तास पुरतो.
गडावर जाण्याच्या वाटा :
गडावर जाण्यासाठी सध्या एकच वाट अस्तित्वात आहे. गडावर जाणारी वाट मुल्हेर गावातून जाते. मुल्हेर गावातून पुढे आल्यावर एक डांबरी रस्ता लागतो. या रस्त्याने वीस मिनिटे पुढे गेल्यावर दोन फाटे फुटतात. एक डावीकडे जातो
तर दुसरा वडाच्या झाडापासून पुढे जातो. ही वाट छोटाशा टेकडीवर असणार्या धनगर-वाडीपाशी पोहोचते. येथून उजवीकडे वळावे आणि थेट मुल्हेर व हरगड यामधील खिंड गाठावी. येथपर्यंत पोहचण्यास दीड तास पुरतो. खिंडीत डावीकडे जाणारी वाट आपल्याला मुल्हेरगडाकडे तर उजवीकडे जाणारी वाट हरगडाकडे घेऊन जाते. वाट फारशी मळलेली नसल्यामुळे अस्पष्ट झालेली आहे. या खिंडीपासून गडमाथा गाठण्यास एक तास पुरतो.
राहण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : नाही.
पाण्याची सोय : नाही. { मेल फॉरवर्ड } महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
किल्ले हातगङ
किल्ले हातगङ
सुरगणा नाशिक मधील एक तालुका.सह्याद्रीच्या पूर्व भागातीलएका रांगेची सुरवात याच तालुक्यापासून होते.यालाच सातमाळ रांग असे म्हणतात.या सातमाळ रांगेतील किल्ले म्हणजे जणु काय एक तटबंदीच.याच रांगेच्या उपशाखेवर एक छोटासा किल्ला आहे त्याचे नाव हातगङ या भागातील जनजीवन मात्र सामान्यच.थोडा फार आधुनिक सुविधा इथपर्यंत देखील पोहचल्या आहेत
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात.पहिल्या दरवाज्याच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याचे टाके लागते.येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे.गडाच्या पहिल्या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहेत.या दरवाज्याजवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत.या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुस-या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगा सारख्या दरवाज्यातून आत शिरतो.या दरवाज्याला पाहून हरीहर किल्ल्याची आठवण येते.या दरवाज्याच्या बाजूला एक गुहासुध्दा कोरलेली आहे यात पाण्याची तीन टाकी आहेत.या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो.गडमाथा खूप विस्तीर्ण आहे.संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो.दरवाज्यातून वर आल्यावर पाय-यांची एक वाट डावीकडे खाली उतरते.येथे मोठा प्रमाणावर तटबंदी आहे.ती आजही ब-यापैकी शाबूत आहे.समोरच एक पीर सुध्दा आहे.उजव्याबाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे ,पाण्याचे एक टाके सुध्दा आहे.हे सर्व पाहून आल्या वाटेने परतावे.आता दरावाज्याच्या उजवीकडची वाट धरावी.येथून थोडे वर गेल्यावर पाण्याचे टाके लागते थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष लागतात.येथे एक बुरुज वजा इमारतही आहे. थोडे खाली उरल्यावर पाण्याचा एक तलाव सुध्दा आहे.यामधील पाणी पिण्यास अयोग्य आहे.तलावाच्या समोरच किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुस-या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुस-या टोकाला एक बुरुज आहे.संपूर्ण गडफेरीस एक तास पुरतो.असा हा हातगड नाशिक पासून १०० कि.मी वर आहे .नाशिकवरून एका दिवसात सहज पाहून होतो.किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुस-या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुस-या टोकाला एक बुरुज आहे.संपूर्ण गडफेरीस एक तास पुरतो.असा हा हातगड नाशिक पासून १०० कि.मी वर आहे .नाशिकवरून एका दिवसात सहज पाहून होतो.
गडावर जाण्याच्या वाटा :
१. हातगडवाडी मार्गे
हातगडाला जाण्यासाठी नाशिक गाठावे.नाशिक सापुतारा मार्गावर बोरगाव नावाचा फाटा आहे.येथून एक रस्ता सुरगण्याला जातो तर दुसरा सापुता-याला जातो.सापुता-याला जाणा-या रस्त्यावर बोरगावपासून ४ कि.मी अंतरावर हातगडवाडी नावाचे गाव आहे हेच गडाच्या पायथ्याचे गाव आहे.गावातन एक डांबरी सडक कळवणला जाते या सडकेवरून पुढे जायचे ,हातगडवाडी डाव्या हाताला ठेवायची.पुढे डावीकडे एक बुजलेली विहीर लागते.या विहीरी नंतर ५ मिनिटांनी डांबरी सडक सोडायची आणि डावीकडची डोंगरधारेवर चढत जाणारी वाट धरायची.या वाटेन १५ मिनिटात आपण एका आंब्याच्या छाडाखाली पोहचतो.कागदावर जशी आपण तिरकी रेघ मारतो तशी या झाडापासून डोंगराच्या माथ्यापर्यंत तिरघी रेघ मारावी ही तिरकी रेघ म्हणजे गडावर जाणारी वाट.पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास पाऊण तास लागतो.
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी
पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे
जाण्यासाठी लागणारा वेळ : हातगडवाडी मार्गेपाऊण तास.
{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
किल्ले सुधागड
किल्ले सुधागड
'गडकोट म्हणजे राज्याचे मूळ'. गडकोट म्हणजे खजिना . गडकोट म्हणजे सैन्याचे बळ. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत.
इतिहास :
सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून
असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. एखाा मोठा सत्तेखाली या गडाची जडणघडण झाली असावी. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ. स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, 'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.' शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून 'सुधागड' असे नामकरण केले.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणार्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : या गडाचा घेरा तसा मोठा आहे.गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात.गडावर पंत सचिवांचा वाडा आहे. यात ५० जणांची राहण्याची सोय होते. तसेच भोराई देवीचे मंदिर आहे. यामध्ये २५ जणांची राहण्याची सोय होते. येथे जंगलही ब-यापैकी आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात. गडावरील पंत सचिवांच्या वाडाच्या बाजूला भोरेश्र्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे. सचिवांच्या वाडापासून पुढे पाय-यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात आणून सोडते. जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याची टाके आहेत.
या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. टाक्यांच्या डावीकडील वाट ही आपणांस चोर दरवाज्यांकडे आणून सोडते. ही वाट मात्र आता अस्तित्वात नाही.पाच्छापूर दरवाजा : या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच धान्यकोठारं,भाडांचे टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते.गडावरील टकमक टोक : वाडापासून आपण पाय-यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते.या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.
गडावर जाण्याच्या वाटा :
सवाष्णीचा घाट : तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. अथवा पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे गावी यावे.तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात. वाट फारच दमछाक करणारी आहे.वाट सरळसोट असल्याने चुकण्याचा संभव कमी आहे. या वाटेने आपण दिंडी दरवाजात येतो. नाणदांड घाट : एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून मावळती कडे निघावे.पुढे पाऊण तासाने नाणदांड घाटात पोहोचतो.पुढे एक बावधान गाव आहे. पुढे पाच्छापूरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे आणि मग गडमाथा अवघ्या दोन तासात गाठता येतो. पाच्छापूर मार्गेः डावीकडे सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच धान्यकोठारं,भाडांचे टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते. गडावरील टकमक टोक : वाडापासून आपण पाय-यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते. या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूच गावे हा परिसर दिसतो
दिंडी दरवाजा : सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणांस दिंडी दरवाज्यात आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील 'महादरवाज्याची ' हुबेहूब प्रतिकृती. हे या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. गडावर वाडाच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून आता मात्र ते गाळाने पूर्ण भरले आहे. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत.त्यावर सुबक नक्षीकाम केले आहे.
राहण्याची सोय : पंत सचिवांचे वाडे येथे उपलब्ध असून येथे ५० माणसे राहू शकतात. तसेच भोराई देवीच्या मंदिरात देखील रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय स्वतः केलेली असल्यास उत्तम. पण तसे शक्य नसल्यास गडावरती 'मोरे' नावाच्या गृहस्थाचे घर आहे. तेथे ४ ते ५ जणांची जेवणाची सोय होऊ शके
पाण्याची सोय : गडावरतीच अनेक हौद आणि तलाव असल्याने बारामही पाण्याची सोय होते
जाण्यासाठी लागणारा वेळ : दोन तास पाच्छापूर मार्गे, तीन तास दिंडी दरवाजा मार्गे.(धोंडसे मार्ग) {मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
किल्ले हडसर
किल्ले हडसर
सह्याद्री म्हणजे दुर्गांची खाणच. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. 'हडसर' हा असाच या भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाटा पासून सुरुवात करून जीवधन ,चावंड , शिवनेरी , लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी सहा दिवसांची भटकंती आपल्याला करता येते.
इतिहास :
हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गड मोठा प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक नमुनाच आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं , नळीत खोदलेल्या पाय-या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे पाहणे म्हणजे दुर्गशास्त्रातील एक वेगळेच दुर्गवैशिष्टच ठरते. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते. तर दुसरी वाट डावीकडे असणा-या दुस-या प्रवेशद्वारापाशी जाते. दुस-या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथेच समोर एक उंचवटा दिसतो. या उंचवटाच्या दिशेने चालत जाऊन डावीकडेवळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. यांच्या कातळावर गणेशप्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत.येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. येथे महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाडात गणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानाची मूर्ती स्थानापन्न आहे. मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरूज आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे. पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साठते. तळ्याच्या मधोमध एक पुष्करणी सारखे दगडातील घडीव बांधकाम आहे. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके दिसते. येथून थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेली प्रशस्त गुहा लागते. मात्र ही गुहा म्हणजे पहारेक-यांची देवडीच होय. मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर अत्यंत सुरेख दिसतो. समोरच चावंड , नाणेघाट , शिवनेरी , भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर न्याहाळता येतो. येथून परत फिरून प्रवेशद्वारापाशी यावे आणि परतीच्या वाटेला लागावे.
गडावर जाण्याच्या वाटा :
या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची असून दुसरी वाट गावक-यांनी त्यांच्या सोयीसाठी दगडात पाय-या कोरून बांधून काढलेली आहे.कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी
हडसर या गावी यावे लागते. जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात आपण बुरूजापाशी येऊन पोहचतो. येथून सोपे कातळरोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. वाटेतच डोंगरकपारीत पाण्याची दोन टाकी आढळतात. दुसर्या वाटेने म्हणजे या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणा-या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. येथून शंभर ते दीडशे पाय-या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे. येथून किल्ल्यावर जाण्यास एक तास पुरतो.
राहण्याची सोय : महादेवाच्या मंदिरात ४ ते ५ जणांना राहता येते. मात्र पावसाळ्यात मंदिरात पाणी साठत असल्याने राहण्याची थोडी गैरसोयच होते.
जेवणाची सोय : वर किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वतःच करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर प्रवेशद्वारातून वरती आल्यावर समोरच बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : १ तास
{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
कुर्डूगड - विश्रामगड
कुर्डूगड - विश्रामगड
पुण्यापासून अवघ्या ९० कि.मी. पश्चिमेस असणारा हा एकाकी लहानखुरा किल्ला .त्याला विशेष प्रकाशात आणले ते कै.दत्तोबा पासलकर यांनी .सह्याद्रीच्या कुशीत पुणे व रायगड जिल्ह्यांच्या सरहद्दीवर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात ह्याचा समावेश होतो, माणगावपासून २० कि.मी. वरील ह्या किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून ७०० मीटर उंचीवर आहे समुद्रसपाटीपासून जरी उंची कमी असली तरी खाडी चढण किवा लांबच लांब उजाड मार्गाने हा किल्ला जवळ करावा लागतो .म्हणून हा सतत उपेक्षितच राहिला आणि राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे, चित्तथरारक प्रसंगही येथे घडल्याचे ज्ञात होत नाही.
किल्यानाजीकच पायथ्याशी चरी कुर्डाई देवीचे मंदिर आहे .त्यावरूनच किल्ल्यास किल्ले कुर्डू हे नाव मिळालं.बाजी पासलकरांनी विश्रांतीकालासाठी या किल्ल्याचा उपयोग केल्याने त्यासच विश्रामगड हेही नामाभिमान प्राप्त झाले असे समजते
किल्ल्यावर कसे जायचे ?
पुण्याहून सकाळी व दुपारी अशा दिवसात दोनदा एस.टी. बसेस सुटतात व त्या आपणास थेट मोसे खुर्द ह्या गावी नेतात .तेथून गाडीरास्त्याने आद्माल ,पडल्घर ,भुईनी ,मुगाव ,कोळशी ह्या रस्त्याने धामणव्हळ गाव उजवीकडे ठेवून वाघजाईच्या ह्गाताने खाली कोकणात उतरता येते .नुकत्याच पूर्ण झालेल्या वरसगावच्या बाजी पासलकर धरणामुळे हा रस्ता आता पाण्याखाली गेला आहे .गर्द वृक्षराजीतील घटने गेले असता सुळक्याप्रमाणे दिसणारा कुर्डू किल्ला नजरेस पडतो .पायथ्यावर असणाऱ्या कुर्डू पेठ ह्या गावातून अवघ्या १५-२० मिनिटांत आपणास किल्यावर पोहचता येते
पाहण्यासारखे बरेच काही
किल्याच्या पायथ्याशी कुर्दैचे अलीकडेच जीर्णोद्धार केलेले मंदिर व कुर्डेश्वर महादेवाचे मंदिर आहे. देवीचे देवळाकडून म्हणजेच पश्चिमेकडून थोडीशी चढण चढून गेले म्हणजे पाण्याचे टाके लागते. कुर्डू पेठ ह्या गावास येथूनच पाणीपुरवठा होतो .गावाची वस्ती प्रामुख्याने कोळी व धनगर जमातीची आहे .तेथून थोडेसे अवघड कड्यावरून मुरमाड ,घसरड्या वाटेने आपण एका प्रचंड शिलाखांडाशी येतो. येथून उत्तरेकडील हनुमान बुरजावर आपण येतो .या बुरुजावरच १ मीटर उंचीची हनुमानाची मूर्ती नजरेस पडते .
याच बुरजावर उभे राहून दक्षिणेकडे नजर टाकल्यास एक छोटा सुळका एका मोठ्या सुळक्यापासून अलग झालेला दिसतो दिसतो .या दोघांच्या मधील खिंडीत थोड्याश्या कौशल्याने जाता येते. अगदी खिंडीत आपणास एक नैसर्गिक खिडकी आढळते .तेथून कोकणातील दूरवरचा मुलुख सहज नजरेस पडतो
{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
सोनार किल्ला
सोनार किल्ला
थरच्या वाळवंटात गेली 855 वर्षे उभा असलेला जैसलमेरचा अतिप्राचीन किल्ला सध्या अतिक्रतमणे आणि बेकायदा बांधकामांशी झुंज देत आहे. मध्ययुगीन कालखंडात सिंध आणि अफगाणिस्तान प्रांतातून होणारे हल्ले परतवणारा हा किल्ला या आक्रमणांपासून कसा वाचवावा , असा प्रश्न येथील स्वयंसेवी संस्थांना पडला आहे.
हा किल्ला पिवळी झाक असलेल्या दगडांत बांधला असल्याने चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी त्याचे नामकरण ' सोनार किल्ला ' ( सोनेरी किल्ला) असे केले होते. मात्र , या किल्ल्याची ही सोनेरी झळाळी आता पार उडून गेली आहे. किल्ल्याच्या आतील भागात मोठमोठी दुकाने , एम्पोरियम , हॉटेल उभी राहिली असून या सगळ्याच्या कचऱ्याचा भार हा शाही किल्ला वागवत आहे.
इ. स. 1212 मध्ये लोडवराच्या भाती सत्ताधाऱ्यांनी हा 99 स्तंभांचा हा किल्ला बांधला असून राजस्थानला भेट देणाऱ्या पर्यटकांचे हे मुख्य आकर्षण आहे. मात्र , किल्ल्याचे बाह्यरूप सुंदर दिसत असले तरी व्यापारी संकुलातून टाकल्या जाणाऱ्या कचरा आणि प्लॅस्टिकमुळे किल्ल्याचे अंतरंग विदुप झाले आहे , असे पर्यटन व्यवसाय महासंघाचे अध्यक्ष जितेंद सिंग यांनी सांगितले.
या किल्ल्याला वाचवायचे असेल तर त्याच्यावरचा हा ताण हलका केला पाहिजे , असे या संघटनेचे म्हणणे आहे. तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला अधिकार तोकडे पडत आहेत , असेही जितेंद सिंग म्हणाले. जिल्हा परिषदेने आतापर्यंत किल्ल्याच्या संरक्षणासाठी अनेक वेळा लोकजागृतीचे प्रयत्न केले. मात्र त्याला अपेक्षित यश आले नाही. राजस्थान सरकार , भारतीय पुरातत्त्व विभाग सवेर्क्षण विभाग आणि ' र्वल्ड वॉच मॉन्युमेंट ' ही स्वयंसेवी संस्थेतफेर् काही वर्षांपूवीर् या किल्ल्याचा जीणोर्द्धार करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र , भारतीय पुरातत्त्व सवेर्क्षण विभाग आणि राजस्थान सरकारने यातील पाच कोटी रुपयांचा वाटा देण्याचे नाकारल्याने ही योजना सरकारी फडताळातच पडून राहिली आणि सत्यजित रे यांनी नावाजलेला जैसलमेरचा ' सोनार किल्ला ' बेकायदा बांधकामांचे आक्रमण झेलत राहिला.
{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
बेलापूर किल्ला
बेलापूर किल्ला
एकविसाव्या शतकातील शहर म्हणून नावलौकिक असलेल्या नवी मुंबई शहराला पेशवाईत विशेष मान होता. पेशवाईतील मोठे केंद म्हणून प्रसिद्धी पावलेल्या या शहरात आता इतिहासाच्या खाणाखुणा अगदी दुमिर्ळ झाल्या आहेत. त्याचेच प्रतीक आहे बेलापूरचा किल्ला. पोर्तुगीजांनी आरमाराचं महत्त्व ओळखून पूवीर्च्या साष्टी प्रांताभोवती (आताचे ठाणे) खाडीकिनाऱ्यावर किल्ले बांधले. त्यापैकी एक बेलापूर किल्ला होय. पारतंत्र्याला कंटाळलेली जनता स्वातंत्र्यासाठी धडपडत होती. या असंतोषाचंंं नेतृत्त्व बेलापूर गावाताील गंगाजी नाईक हा पराक्रमी पुरुष करीत होता. पेशव्यांनी वसईचा संघर्ष पुकारला तत्पुवीर् बेलापूर किल्ल्यावरचा लढा, ऐतिहासिक ठरला. दुदेर्वाने या लढ्याचे स्मरण स्थानिकांना राहिलेले नाही.
नवी मुंबई शहराचा मरीन ड्राइव्ह म्हणून ओळखला जाणारा पामबीच मार्ग बेलापूरला ज्या ठिकाणी सुरु होतो. त्याच ठिकाणी उरणकडे जात असलेल्या रस्त्यावर एक मनोरा लक्ष वेधून घेतो. हा मनोरा ऐतिहासिक असेल याची सुतराम कल्पना वेगाने वाहने हाकणाऱ्या वाहनधारकांना नसेल. पण, हा दगडी मनोरा नसून पेशवे व
इंग्रजांच्या काळचा टेहळणी बुरूज आहे. या बुरूजावरून शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवले जायचे. आता हा बुरूज कसाबसा अस्तित्त्व टिकवून आहे. बेलापूर किल्ल्याची शान असलेला पूवेर्कडचा अवघा एक बुरूज आज पडीक अवस्थेत आहे. आज या ऐतिहासिक वास्तूला आधुनिक वास्तूंनी वेढले आहे. शेजारीच सिडकोने पंचवीस वर्षापूवीर् अधिकाऱ्यांसाठी गेस्ट हाऊस बांधले पण किल्ल्याची डागडुजी करण्याचे मात्र टाळले. या किल्ल्याच्या बाजूला सनदी अधिकाऱ्यांच्या आलिशान वास्तू उभ्या राहिल्याने या किल्ल्याचे अस्तित्वच संकटात आले आहे.
बेलापूर किल्ल्यावर ११ आणि तटबंदीवर ६ अशा एकूण २० तोफा होत्या. मुंबई बेट, साष्टी, पनवेल या जलमार्गाबरोबर प्रबळगड, मलंगगड, कर्नाळा या किल्लावर नजर रोखण्याची जबाबदारी बेलापूर किल्ला पार पाडायचा. नारायण जोशी या पेशव्यांच्या पराक्रमी सेनापतीने बेलापूर किल्ल्यावर साहसी चढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली. ३१ मार्च १७३१ साली झालेल्या या लढाईत पेशव्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हतबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार २८ एप्रिल १७३१ साली कुटुंबासह गलबतात बसून निघून गेला आणि पेशव्यांनी या किल्ल्यावर जरीपटक्याचे निशाण फडकवले. पेशव्यांच्या बेफिकिरीमुळे नंतरच्या काळात बिटिशांचा अंमल या किल्ल्यावर कॅप्टन चार्ल्स याच्या अधिपत्याखाली पुन्हा सुरु झाला. सवाई माधवरावांच्या कारकिदीर्त तोतया सुखनिधन नामक कनोजी ब्राह्माणाचे प्रकरण गाजले. पेशव्यांचं किल्लेदार मानेजी आंग्रे या किल्लेदारांनी भामट्याची वरात काढून त्याची रवानगी पुण्याकडे केली. मात्र सदाशिवभाऊंनी इंग्रजांबरोबर हातमिळवणी केल्याने २३ जून १८१७ साली हा किल्ला पेशव्यांच्या हातून गेला.
या किल्ल्याच्या पायथ्याशी आजही किल्ल्याशी संबंधितांचे वंशज वास्तव्यास आहेत. आजही ऐतिहासिक पाण्याची विहीर १७३२ साली बांधल्याची नोंद असलेली आहे. साधारणत: याच काळातले गायधनी आणि आताचे गोवर्धनी माता मंदिर आहे. आता या प्राचीन मंदिराचा विश्वस्त असलेल्या विधान परिषद सदस्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मंदिराचा जीणोर्द्धार हाती घेतला आहे. आज या किल्लाचा एकच बुरुज शाबूत आहे. मात्र काही वर्षांपूवीर् संपूर्ण किल्ला होता. पुकार या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी किल्ल्याचा काही भाग कोसळला. सिडकोच्या बेफीकिरीने मंदिराजवळील मोठा बुरुजही कोसळला. गेस्ट हाऊसचे बांधकाम करताना एक बुरुज पडला. दरसाली अश्विन महिन्यात या किल्ल्याच्या पायथ्याशी जत्रा भरते. आज दुरवस्थेतील हा किल्ला नवी मुंबईची शान आहे याचेच भान संबंधितांना राहिलेले नाही. किल्ल्याच्या आवारात झालेले बांधकाम याचा धडधडीत पुरावा आहे.
निष्क्रीय राजकारणी व सिडकोच्या बेफिकीरीचा उत्कृष्ट नमुना हा बेलापूर किल्ला आहे. आजही अनेकांना झाडाझुडपामध्ये किल्ला आहे याची जाणच नाही. कारण या किल्ल्याला पाहिजे तशी प्रसिद्धीच मिळालेली नाही. पूवीर् गोवर्धनी माता मंदिराच्या पायऱ्या चढून किल्ल्याची वाट चढता यायची. आता तीदेखिल सुविधा नाही. याठिकाणी कुंपण घालून किल्ल्यावर जाणारी वाटच बंद करण्यात आली आहे. दाट वनराईंमध्ये किल्ला शोधल्याशिवाय सापडत नाही. एकदा वाट सापडल्यावर पुन्हा वाट चुकण्याचा संभव अधिक आहे. शिवाय निर्मनुष्य भाग असल्याने व दाट झाडीमुळे सर्पांचा, विषारी प्राण्यांचा धोका असल्याने या तेजपुंज इतिहासाचा दौरा करताना जरा जपलेले बरे असते. सह्यादीच्या कड्याकपाऱ्यातून मावळयांच्या वाशीच्या पट्टयात लढाई केल्याची नोंद ऐतिहासिक बखरीमध्ये आहे. तसेच बृहस्पती स्वामींनी पेशव्यांना बेलापूर किल्ल्यासंबंधी लिहिलेल्या दस्ताऐवज बखरींचा रुपात वाचायला मिळतो. इंग्रजांनी बेलापूर किल्ल्यावर दप्तरखाना चालू करुन महसूल प्राप्तीचा दर्जा नंतर या भागाला दिला. याठिकाणी नंतर दप्तरखाना होता. या ठिकाणची संबंधित कागदपत्रे गहाळ झाल्याचा संशय व्यक्त केला जातो.
उरण परिसरातील खांदेरी उंदेरी सारखे किल्ले टिकवले जात असताना बेलापूर किल्ल्याचे अस्तित्व टिकण्याची आता शाश्वती राहिलेली नाही. महिनाभर झुंज देवून पेशव्यांनी स्वराज्यात दाखल करुन घेतलेला हा किल्ला आता आपल्याच राज्यात अखेरच्या घटका मोजत आहे. याकडे शिवरायांचे नाव घेवून राज्य करणाऱ्या राजकारण्यांचे दुर्लक्ष होत आहे.
आता पुरातत्व खात्याकडे हा किल्ला संरक्षित करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र लालफितीच्या कारभारामुळे यात अनंत अडचणी येत आहेत. आहेत. यासंदर्भात नुकतीच सरकारच्या अंदाज कमिटीने बेलापूर किल्ल्याची पाहणी केली. यावेळेस सिडकोमार्फत बेलापूर किल्ला संरक्षण व संरक्षित करण्याबाबत प्रेझेंन्टेशन करण्यात आले होते. भावीपिढीच्या माहितीसाठी या किल्ल्याचे अस्तित्व राखण्याची अत्यंत गरज असल्यानेच या कमिटीने बेलापूर किल्ल्याच्या संरक्षणासाठी तातडीने कार्यवाही करण्यास संबंधितांना सूचना केली आहे.
{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहेकिल्ले लोहगड
किल्ले लोहगड
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः लोणावळा
जिल्हा : पुणे
श्रेणी : सोपी
पवनामावळात असणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचाक संरक्षक असणारा हा लोहगड पुणे – मुंबई हमरस्त्यावरून सहजच नजरेस पडतो. पुण्या आणि मुंबईपासून जवळ असल्या कारणाने येथे ट्रेकर्स मंडळींची नेहमीच ये जा चालू असते. किल्ल्याच्या पोटात भाजे आणि बेडसे या प्रसिध्द लेण्या आहेत.. मुंबई – पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. महामार्गापासून जवळच असल्याने पायथ्याच्या गावात सर्व सुखसुविधा आहेत.
इतिहास : लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.इ. स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. इ. स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ. स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड – विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ. स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ. स. १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगर्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला.इ. स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. सर्वप्रथम
१. गणेश दरवाजाः- ह्याच्याच डाव्या – उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीचीपाटिलकी देण्यात आली होती.येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.
२. नारायण दरवाजाः- हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई.
३. हनुमान दरवाजाः- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.
४. महादरवाजाः- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले.महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्र अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे.उजवीकडे ध्वजस्तंभ आहे.याच्या जवळच एक तोफ काही हौश दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथ-यात बसवलेली आहे.अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीत राहाण्याची सोय होते.या कोठीत अनेक खोल्या आढळतात.दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे , जिथे एक सुंदर शिवमंदिर आढळते.पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे.हे तळ अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे.ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते.नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे.हे तळं सोळाकोनी आहे.मोठा तळ्याच्या पुढे विंचुकाटाकडे जातांना वाडांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. या विंचूकाटास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते . गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो,म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात.या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजुबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाटा चा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेण्या आवर्जून पाहव्यात.पावसाळ्यातील लोहगडाचे रुप पाहिले की मनोन्मनी गुणगुणतं…। ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी। आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी ॥
गडावर जाण्याच्या वाटा : लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
१) पूण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणा-या मळवली स्थानकावर उतरावे.तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणरी वाट पकडावी.वाट मोठी आणि प्रशस्त आहे.तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी.खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास प ास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो.या मार्गेलोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.
२) लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडावाडी पर्यंत जाता येते.पवना धरणाकडे जाणा-या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून ३ ते ४ किं मी अंतरावर लोहगडावाडी आहे.उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत.साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे.मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही.स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून ट्रॅक्सने जाता येते मात्र ट्रॅक्सभाडे १००० रु आहेत.
३) काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे.तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो.पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेक टेकडीवर जातो तेथून एक मळलेलीपायवाटआपणासलोहगडावाडीत घेऊन जाते.या टकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे.या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.
राहण्याची सोय : लक्ष्मी कोठी रहाण्याची एकमेव सोय आहे.३० ते ४० जण आरामात राहू शकतात.
जेवणाची सोय : आपण स्वतः जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्यक जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय : बारामही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : २ तास.
{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहेतिकोना किल्ला
तिकोना किल्ला

तिकोना किल्ला : नावाप्रमाणेच हा किल्ला त्रिकोणी आहे. चढायला अतिशय सोपा आहे. अर्ध्या तासात पायथ्यापासून वरपर्यंत जाता येतं. १६५७ साली शिवरायांनी हा किल्ला जिंकून घेतला. पवना, मावळ या परिसराची पाहणी करण्यासाठी या किल्ल्याचं स्थानं मोक्याचं होतं. त्याची जबाबदारी शिवरायांनी नेताजी पालकर यांच्याकडे दिली होती. संभाजी राजांची औरंगजेबचा मुलगा अकबर याच्याशी भेट इथेच झाली. तिथे काही काळ राहण्यासाठी त्याला संभाजी राजांनी परवानगी दिली होती. १८१८ साली हा किल्ला घेण्यासाठी ब्रिटिशांशी युद्ध झालं. त्यामध्ये किल्ल्याची हानी झाली. तुंग-विसापूर-लोहगड हे किल्ले आणि पवना डॅम असं अप्रतिम दृष्य इथून दिसतं. किल्ल्यावर छान मंदिर आहे. एक गुंफा आहे. त्यामध्ये १०-१५ जण राहू शकतात. पाण्याचं टाकंही आहे. तिथून बालेकिल्ल्यावर जाताना तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष दिसतात. वरती महादेवाचं मंदिर आहे.
लोहगड व विसापूर किल्ले लोणावळ्याच्या पुढे असलेल्या मळवली इथून जवळ आहेत. तिथून भाजे गावात जायचं. लोहगड चढण्यासाठी मळलेली वाट असल्यानं चुकायचा प्रश्न येत नाही. वाटेत सुरुवातीला बौद्धकालीन भाजे लेणी लागतात. मुद्दाम थांबून बघावं अशा या लेण्या आहेत. तिथून साधारणा दीडेक तासात पायथ्याच्या लोहगडवाडी या गावापर्यंत येता येतं. तिथल्या पठाराच्या एका बाजूला लोहगड आणि दुसऱ्या बाजूला विसापूर किल्ला आहे. तिथून लोहगड किल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्या सुरू होतात. लोहगड, विसापूर व तिकोना हे सातवाहनकालीन किल्ले आहेत. त्यांनी बहमनी, निझामशाही, आदिलशाही, शिवकाल अशा अनेक राजवटी पाहिल्या. इथल्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होई. या परिसरात लेण्याही अनेक आहेत
{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
Sunday, April 24, 2011
किल्ला रसाळगड
किल्ला रसाळगड
सह्याद्रीची रांग उत्तरदक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग आपले लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोर्यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंदगड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
रसाळगडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस एक ते दीड तास पुरतो. रसाळवाडीतून किल्ल्यावर शिरतानाच वाटेत दोन दरवाजे लागतात. पहिले प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीचे दर्शन होते. वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसर्या दरवाजात पोहचतो. या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते. तोफा हे या किल्ल्यांचे मोठे वैशिष्टच आहे. किल्ल्यावर लहानमोठा मिळून सुमारे १६ तोफा आहेत.संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच होय. समोरच झोलाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोनाडात अनेक सापडलेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत. मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. समोरच एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे. मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला शिवाचे छोटेसे मंदिर आहे. पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा आहे , यालाच बालेकिल्ला म्हणतात. यात वाडांचे मोठा प्रमाणावर अवशेष आहेत. बुरूजाव तोफा आढळतात. येथून समोरच एक दगडी बांधकाम असलेली खोली आढळते. हे धान्य कोठार असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या जवळच आणखी एक पाण्याचा तलाव आहे. या दोन्ही तलावात बारामही पाणी असते. किल्ल्याच्या नैऋत्य भागात एक नंदी आहे. मात्र येथे शिवाची पिंड आढळत नाही. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठा प्रमाणावर आहेत. म्हणजे हा किल्ला पूर्वी मोठा प्रमाणावर नांदता असावा.
गडावर जाण्याच्या वाटा :
१.खेड वरून वडगाव बिरमणी कडे जाणारी बस पकडायची आणि वाटेत असणार्या हुंबरी फाटावर उतरायचे. हुंबरी फाटापासून थेट बीड गावात जाणारी वाट पकडायची. साधारणतः बीड गावात पोहचण्यास एक तास लागतो. वाडीबीड गावातून गडावर जाण्यास मळलेली वाट आहे. या मार्गाने किल्ल्यावर पोहचण्यास दीड तास लागतो.
२.खेड वरून निमनी गावात जाण्यासाठी बसेस सुटतात. निमनी गावात उतरून एका तासात रसाळवाडी मार्गेकिल्ला गाठता येतो. वाट अत्यंत सोपी आहे.
३.खेड वरून मौजे जैतापूर गावात जाणारी एस. टी. पकडावी. मौजे जैतापूरहून - रसाळवाडी मार्गेदोन तासात रसाळगड गाठावा. वाट अत्यंत सोपी आहे.
राहण्याची सोय :झोलाई देवीचे मंदिर (३० ते ४० माणसे राहू शकतात.)
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी
पाण्याची सोय : बारामही उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : रसाळवाडीतून (१५ मिनिटे)
{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
Friday, April 22, 2011
किल्ले रामसेज
किल्ले रामसेज
‘किल्ले
‘किल्ले रामसेज’ गुलशनाबादेपासून (नाशिक) चार कोसावर उभा होता. किल्ला कसला एखादी छोटीशी टेकडीच. रायगड, राजगडसमोर रामसेज तर अगदी लिंबूटिंबूच. किल्ल्यावर तोफा, दारूगोळा, बंदुका, प्रचंड खजिना नव्हता. मग काय होतं? किल्ले रामसेजचा अनाम किल्लेदार (या किल्लेदाराचं नाव दुर्दैवाने इतिहासाला माहीत नाही) छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचा मरहट्टा नाईक आणि भगव्याचा निष्ठावंत पाईक आणि त्याची मूठभर मराठी सेना. रामसेजच्या किल्लेदारांनी आपल्या सेनेत स्वाभिमानाचा अंगार पेटवला. तो आपल्या सेनेस उद्देशून म्हणाला, ‘‘गड्यांनो, थोरलं राजं हयात नाहीत. रायगडावर त्याचा अंश संभूराजे हायती. त्यांच्या आदेशानुसार किल्ला जुझवायचाच. अवरंगजेबाला मराठी मातीचा हिसका दावायचा...घ्या सप्तशृंगीचे नाव...हर हर महाऽऽदेव!’’ कितीतरी वेळ किल्ल्यावर हर हर महादेवची गर्जना घुमत राहिली.
शहाबुद्दीनच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य किल्ला चढू लागले. किल्ल्यावरून प्रतिकाराची कोणतीच हालचाल दिसून येत नव्हती. मुघल मराठे घाबरले या आनंदात ते किल्ला चढू लागले. अर्धाधिक किल्ला चढून गेल्यावर मुघल सैन्याला गडगडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. त्यांनी वर पाहिले तर काळ्याकभिन्न शिळा किल्ल्यावरून खाली झेपावत होत्या. मुघली सैन्याचा चुराडा करीत शिळा खाली झेपावू लागल्या. किल्ल्याच्या तळात मुघली सैन्याच्या प्रेतांचा खच पडू लागला. शहाबुद्दीन आश्चर्यचकित झाला आणि किल्ल्यावर पहिल्या विजयाचा जयघोष घुमला. किल्ले रामसेजवर मुगली तोफखाना धडाडू लागला, पण किल्लेदाराला त्याची पर्वा नव्हती. कारण त्यांनी किल्ले रामसेजच्या भोवती एक अदृश्य लक्ष्मणरेषा आखली होती. जो कोणी ती ओलांडायचा प्रयत्न करी त्यास दगडधोंड्याचा प्रसाद मिळत होता. संभाजीराजांनी किल्ले रामसेजवर रसद पोहोचवली. किल्लेदारांचा आणि मावळ्यांचा हुरूप वाढला. औरंगजेबाने शहाबुद्दीन, बहादूर कोकलताश आणि कासिमखान किरमाणी असे सरदार बदलून बघितले, पण रामसेज हार जात नव्हता. बहादूरखानाने तर 100 तोळे वजनाचा सोन्याचा सापही भुतांना वश करण्यासाठी आणि मुघलांना विजय मिळावा म्हणून वापरला. पण मराठी भुतांनी त्यास दाद दिली नाही. रामसेजसारखा लिंबू-टिंबू किल्ला एक नव्हे दोन नव्हे, तर साडेपाच वर्षं औरंग्याला झुंजवत होता. शेवटी रसद संपल्यामुळे त्या बहाद्दर किल्लेदाराने पन्नास हजार रुपयांच्या मोबदल्यात किल्ला अब्दुल करीमच्या ताब्यात दिला. औरंगजेबाला ही सुवार्ता कळविण्यात आली. त्याने किल्ल्याचे नामकरण केले, ‘रहिमगड.’
रामसेजचा किल्लेदार उदास मनाने पन्नास हजारांची थैली घेऊन रायगडावर आला. संभाजीराजांनी त्याची सर्फराजी केली. ‘‘आबासाहेबांच्या शब्दांप्रमाणे किल्ला लढविलात. भले शाब्बास! आता अजून एक कामगिरी, औरंगजेब रामसेज सजवतोय. तटा-बुरुजांनी सजवू द्या! एकदा का रामसेज सजला की पुन्हा आणाल स्वराज्यात!’’ रामसेजचा किल्लेदार आनंदाने थरारला. थोडे दिवस रायगडावर मुक्काम ठोकून, एका काळ्याकभिन्न रात्री आपल्या मावळ्यांसह रामसेजच्या तटाला भिडला आणि पहाट व्हायच्या आत पुन्हा रामसेजवर भगवा फडकवला! रामसेजवरील मराठ्यांच्या जयघोषांनी अवरंगजेबाची झोप उडाली. त्याला शिवाजीराजांच्या एका पत्रातील वाक्ये आठवली. ‘‘आमचा एक एक किल्ला एक एक वर्ष लढेल! आमच्याकडे 350 किल्ले आहेत. मराठी मुलुख जिंकताना तुझी उमर सरून जाईल.’’
नाशिक-पेठ रस्त्यावर नाशिकपासून 15 कि.मी.वर आशेवाडी गावाजवळ किल्ले रामसेज आजही ताठ मानाने उभा आहे. सध्या किल्ल्यावर श्रीरामाचे मंदिर आहे. किल्ल्यावर नऊ लहान मोठी तळी आहेत. यातील रामतळे महत्त्वाचे. सध्या किल्ल्याचे अस्तित्व दर्शविणारे फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत. पण छत्रपती संभाजी राजांवरील स्वामिनिष्ठेचे प्रतीक म्हणून किल्ले रामसेज इतिहासात अजरामर ठरला आहे.
किल्ल्यावर ठराविक अंतरापर्यंत वाहनाने जाता येते. नाशिक भेटीच्या वेळी ‘किल्ले रामसेज’ला आवर्जून भेट द्या. आणि औरंग्याच्या सेनासागराला साडेपाच वर्षे झुंजवणार्या किल्ले रामसेज आणि त्यावरील आनाम मावळ्यांसमोर नतमस्तक व्हा!
रामसेज’ {मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
किल्ले राजगड..
किल्ले राजगड..
किल्ल्याची उ : १३९४ मीटर.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः पुणेजिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
हिंदवी स्वराज्याची राजधानीगडांचा राजा, राजियांचा गडराजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर अन् भोरच्या बायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नांच्या खो-यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभे असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली.राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो.
इतिहास : राजगडा संबधीचे उल्लेख
१)’राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले अभे स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचा नेता शिवाजी याला राज्यविस्तारासाठी किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला.’
-जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे)
२) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो- ‘राजगड हा अतिशय उंच. त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या द-याखो-यातून आणि घनघोर अरण्यातून वा-याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.’
३) महेमद हाशिम खालीखान याने ‘मुन्तखबुललुबाब-ए-महेमदॉशाही ‘ नामक ग्रंथामध्ये म्हणतो,’राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु?काय त्या किल्ल्याची उंची, काय त्यांचा विस्तार !जणू काही आकाशच पसरले होते त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस पशु दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठिण होते.’
इतिहास :इतिहासातून अस्पष्ट येणा-या उल्लेखांवरुन सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वी पासूनचा हा डोंगर आहे. ब्रम्हर्षी ऋषींचेयेथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरुन डोंगर फार पुरातन असावा.राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव हा किल्ला बहमनी राजवटी मध्ये याच नावाने ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते. इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरूंबदेव हा किल्ला हस्तगत केला. मुरुमदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरूमदेव किल्ला निजामशाही कडून आदिलशही कडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिलीमकर व त्याचे वडीलरुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबरावाने मुरुमदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखामाकडे दिला.
१६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुमदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला. या कामगिरी बद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिलीमकरांचा नंतर सन्मानही केला. शिवरायांनी मुरुमदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखीत पुरावा आज मात्र उपलब्ध नाही त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणे अनिश्चितच आहे. शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, ‘शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.’ सभासद बखर म्हणतो की, ‘मुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले त्याचे नाव राजगड म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणली आहे.’ मात्र सन १६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठा झपाटाने सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले.इसवीसन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही ६ एप्रिल १६६३ रोजी शाहीस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले. सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठांनी किल्ल्यावरुन विलक्षण मारा केल्या मुळे मुगलांना माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे’सत्तावीस किल्ले तांब्रास दिले. निशाणे चढविली वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे व निलोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला.’ शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरुप पोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरुनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१-१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी निश्चित केले आणि राजधानी रायगडावरुन राजगडाकडे हलविली. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडून ठार मारले यानंतर मुगलानी मराठांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मुगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र आप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने ‘कानद खो-यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मुगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्या बद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत ‘ असा आदेश दिला होता. पुढे ११नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून ावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडा जवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच त्याच उंचीचे दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडीमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ‘नाबिशहागड’असे ठेवले. २९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवा बरोबर राजगडावर स्वारी करुन तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या स्वाधीन झाला. पुढे शाहुच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहुने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी
माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली.पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाई मध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थिती मध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते – राजवाडे खंड १२. यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिलीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबत-पवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत- खोपडे घराण्यातील या शिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारी सुद्धा असत.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पद्मावती तलाव :-गुप्तदरवाजा कडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा प्रमाणात साचला आहे. रामेश्र्वराचे मंदिरःपद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वभिमुख असे रामेश्र्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतिरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. राजवाडाः रामेश्र्वर मंदिरापासून पाय-यांनी वर जातांना उजवीकडे राजवाडाचे काही अवशेष दिसतात.या राजवाडामध्ये एक तलाव आहे.या शिवाय राजवाडापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो.याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारुकोठार आहे. सदरःही गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू. रामेश्र्वर मंदिरापासून पाय-यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाडाचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे.अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे. पाली दरवाजाःपाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पाय-या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेश द्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना ‘फलिका’ असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेक-यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो. गुंजवणे दरवाजाः-गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिक आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाजाला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरुज आहे. गुंजवणे दरवाजाच्या दुस-या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे.या दरवाजाच्या शेवटी व गणेश पट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिके समोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरुन श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरुन असे अनुमान निघते की,हे प्रवेशद्वार शिवपूर्वकालात बांधलेले असावे. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूस पद्मावती माचीःराजगडाला एकूण ३ माच्या आहेत. या पैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर,सईबाईंची समाधी ,हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत.याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत. पद्मावती मंदिर :सध्या २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. शिवरायांनी किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले याचा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मूर्त्या दिसतात. मुख्य पुजेचे मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन्न केली आहे. त्याच्या उजव्या बाजुला लहान असलेली मूर्ती शिवरायांनी स्थापित केलेली आहे तर दोन मूर्तीच्या मध्ये शेंदूर पहारेक-यांच्या देवडा आहेत.फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मर्ती आहे. या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे. संजीवनी माचीःसुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरुन उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुंज लागतात. या तिन्ही बुरुजावर शिवकालात प्रचंड मोठा तोफा असाव्यात या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदी कडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळु दरवाजाने सुद्धा येते. आळु दरवाजा पासून राजगडाची वैशिष्टय असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पाय-यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. आळु दरवाजाःसंजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून जात असे. आळु दरवाजा सस्थितीला ब-यापैकी ढासाळलेल्या अवस्थतेत आहे. या दरवाजावर एक शिल्प आहे. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे असे चित्र या शिल्पात दाखवले आहे. सुवेळा माचीःमुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणा-या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटे दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे येसाजी केक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुस-या टप्पयावर जाते तर डावीकडे जाणारी वाट काळेश्र्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते. आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरु होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुस-या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुस-या टप्पयाकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते या खडकालाच नेट किंवा ‘हत्तीप्रस्तर’ असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात.हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे. काळेश्र्वरी बुरुज आणि परिसरःसुवेळा माचीच्या दुस-या टप्प्याकडे जाणा-या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्र्वर मंदिराचे काही अवशेष आहेत.या रामेश्र्वर मंदिरात शिवलिंग, भग्र नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात. या रामेश्र्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्र्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो. बालेकिल्लाःराजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तरबुरुच आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे.ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात.येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे.या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाडांचे अवशेष आढळतात. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात. गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.
गडावर जाण्याच्या वाटा :
१.गुप्तदरवाज्याने राजगड : पुणेर् राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते.बाबुदा झापा पासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत.यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते.यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.
२.पाली दरवाज्याने राजगडः-पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे पाबे या गावी उतरुन कानद नदी पार करुन पाली
दरवाजा गाठावा.ही वाट पाय-याची असून सर्वात सोपी आहे.यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात
३.गुंजवणे दरवाज्याने राजगङ... पुणे वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते.ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात.माहितगारा
शिवाय या वाटेचा उपयोग करू नये.
४.अळु दरवाज्याने राजगडः-:भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो.शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.
५.गुप्तदरवाजामार्गे सुवेळामाची :-:गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे सुवेळा माचीवर येते.गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत.
राहण्याची सोय :
१.गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.
२.पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : पद्मावती मंदिराच्या समोरच बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : ३ तास.
{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
सिंहगड
सिंहगड
किल्ल्याची उंची : ४४०० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः पुणे
जिल्हा : पुणे
श्रेणी : सोपी
पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूटउंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्र्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पाय-यांसारखा दिसणारा खांदकडाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा ह्यामुळे पुण्यातून कुठूनही तो पटकनध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूख गडावरून दिसतो.
इतिहास : हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहिकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स.१६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांचे निधन झाल्यावर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स.१६४९ मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये सिंहगड पण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्याचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत होता पण तो बाटून मुसलमान झाला. सिंहगड हा मुख्यतः प्रसिद्ध आहे तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून सुटून परत आले तेव्हा त्यांनी दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तानाजीने कोंडाणा आपण घेतो म्हणून कबूल केले. या युद्धाबाबत सभासद बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतोः तानाजी मालूसरा म्हणून हजारी मावळियांचा होता त्याने कबूल केले की,’कोंडाणा आपण घेतो ‘, असे कबूल करून वस्त्रे,विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कडावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्यांशी व तानाजी मालुसरा सुभेदार यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरि वोढ घेऊन, दोधे महारागास पेटले. दोधे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ),याने हिंमत धरून, कुल लोक सावरून, उरले राजपुत मारिले. किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजाना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले ,’एक गड घेतला, परंतु एक गड गेला.’ माघ व नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.
दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.
टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळकयेत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.
कोंढाणेश्र्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन
आहे.
श्री अमृतेश्र्वर भैरव मंदिर : कोंढाणेश्र्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्र्वराचे प्राचीन मंदिरलागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मुरत्या दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.
देवटा के : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यासयेत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.
कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यासह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती.श्रीशालीवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.
उदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता.झुंजारबुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून याबुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचेखोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.
डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.
राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी.मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणा-या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि.२ मार्चइ.स.१७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.
तानाजीचे स्मारक : अमृतेश्र्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिध्द तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ व नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईततानाजी मारला गेला. दरवर्षी माघ व नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.
गडावर जाण्याच्या वाटा :
पुणे-कोंढणपूर : पुणे-कोंढणपूर बसने कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून कल्याण दरवाजातून आपण गडावर जातो. या मार्गाने दोन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.
पुणे दरवाजा : पुणे-सिंहगड या बसने जाताना वाटेत खडकवासला धरण लागते. या मार्गाने तीन दरवाजे पार केल्यावरआपला गडावर प्रवेश होतो.
राहण्याची सोय : नाही
जेवणाची सोय : गडावर छोटे हॉटेल्स यामध्ये जेवणाची सोय होते. पाण्याची सोय : देवटाक्यांमधील पाणी बारामहिने पुरते. जाण्यासाठी लागणारा वेळ : २ तास
{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
किल्ले रत्नदुर्ग
रत्नदुर्ग
किल्ल्याची उंची : ० * किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग * डोंगररांगः कोकण जिल्हा : रत्नागिरी * श्रेणी : अत्यंत सोपी
रत्नांगिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर असणारा रत्नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दिसणार्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणार्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे. रत्नदुर्ग रत्नांगिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोडाच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे.
इतिहास : रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहमनी काळात झाली. १६७० साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला अदिलशहाकडुन जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणली.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबक बांधणीचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते. हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग. आज हा भुयारी मार्ग वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना लागणार्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनार्यावर ज्याठिकाणी होतो तेथे असलेली एक प्रचंड गुहा स्पष्ट दिसते. या भिंतींनी संरक्षित केलेल्या तीन तोंडाच्या भुयारी मार्गापासून थोडे पुढे चालत गेले असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरूज लागतो. या बुरुजाचे नाव रेडे बुरूज असून यावर एक स्तंभही उभारला आहे. किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून या दीपगृहावरुन संपूर्ण रत्नांगिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल विहीर आहे. रत्नांगिरी शहरातून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा सोईची असून रत्नांगिरी शहराचा नजारा दीपगृहावरुन बघण्यासाठी संध्याकाळी ५.०० च्या सुमारास गेल्यास तशी परवानगी मिळू शकते.
गडावर जाण्याच्या वाटा : किल्ल्यावर जाण्यासाठी वरपर्यंत डांबरी रस्ता असून किल्ल्याच्या पायथ्याशीच शंकराचे श्री भागेश्र्वर मंदिर आहे. या मंदिराच्या खांबांवर पशुपक्ष्यांची सुंदर सुंदर चित्रे केरलेली असून मंदिराच्या सभोवती नारळी, पोफळी व फुलझाडांनी बहरलेली बाग आहे.
राहण्याची सोय : नाही.
जेवणाची सोय : नाही.
पाण्याची सोय : मंदिराजवळ पिण्याचे पाणी मिळू शकते.
{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
किल्ले शिवनेरी
किल्ले शिवनेरी
किल्ल्याची उंची : ३५०० फूट * किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग * डोंगररांगः नाणेघाट * जिल्हा : पुणे * श्रेणी : मध्यम
शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे हे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही.१६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंधात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
इतिहास : ‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठा प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ. स. १४४३ मध्ये मलिक – उल – तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ. स. १४७० मध्ये मलिक – उल – तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ. स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधारावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म जाला शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार.’ इ. स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ. स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ. स. १६७८मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत करण्यात आला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावरमुख्य वाटसोडून उजव्या बाजूने पूढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे ‘ मंदिर लागते. मंदीराच्या मागे असणा-या कडात ६ ते ७ गुहा आहेत.या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे . शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितिस या अंबरखान्याची मोठा प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात.एक वाट समोरच असणा-या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते. वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. जिजाउंच्या पुढात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आवीर्भावातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा’ मध्ये बसविला आहे.शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी पाण्याचे टाकं’ आहे.येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कडाचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.गड फिरण्यास २ तास पुरतात. वर किल्ल्यावरून चावंड, नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो.
गडावर जाण्याच्या वाटा :गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.साखळीची वाट : या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात . डाव्या बाजूस जाणा-या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते.भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पाय-यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.
सात दरवाज्यांची वाट : शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पाय-यांपाशी घेऊनजातो. या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्तीदरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा या मार्गेकिल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तासलागतो.
मुंबईहून माळशेज मार्गेः जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते९ किलोमीटरवर ‘शिवनेरी १९ कि.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास एक दिवस लागतो.
{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
किल्ले पुरंदर
किल्ले पुरंदर
किल्ल्याची उंची : १५०० मीटर * किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग * डोंगररांगः पुणे * जिल्हा : पुणे * श्रेणी : सोपी *
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाटावर सिंहगड आहे. तोच फाटा तसाच पूर्वेकडे अदमासे २४ कि. मी. धावून भुलेश्र्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर, वज्रगड वसलेला आहे. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याला चौफेर माच्या आहेत. किल्ल्याचे स्थान १८.२८ अंश अक्षांश व ७४.३३ अंश रेखांश वर स्थित आहे. किल्ला पुण्याच्या आग्रेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारूगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.
इतिहास : अल्याड जेजुरी पल्याड सोनोरी मध्ये वाहते कर्हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा । असे पुरंदर किल्ल्याचे वर्णन केलेले आढळते. पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. या गावात यादवकालीन धाटणीचे महादेवाचे मंदिर आहे. यावरून हा किल्ला साधारण १००० ते १२०० वर्षांपूर्वीचा आहे असे अनुमान निघते. पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे ‘इंद्रनील पर्वत’. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकण्ठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहंमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ. स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजी राजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १६ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरी मध्ये असे आढळते. ‘तेव्हा पुरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभु म्हणून होता. त्याजबराबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठाण पाच हजार याखेरीज बैल वैगरे लोक ऐशी फौज गडास चौतर्फा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धोरंदर युद्ध जाहले. मावळे लोकांनी व खांसा मुरारबाजी यांनी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.’ मुरारबाजी देशपांडे चे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला, ‘अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावजितो.’ ऐसे बोलिता मुरारबाजी बोलिला ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?’ म्हणोन नीट खानावरी चालिला. खानावरी तलवरीचा वार करावा तो खानाने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, ‘असा शिपाई खुदाने पैदा केला.’ खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध ‘पुरंदरचा तह’ झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना ावे लागले. त्यांची नावे अशी, १. पुरंदर २. रुद्रमाळ किंवा वज्रगड ३. कोंढाणा ४. रोहीडा ५. लोहगड ६. विसापूर ७. तुंग ८. तिकोना ९. प्रबळगड १०. माहुली ११. मनरंजन १२. कोहोज १३. कर्नाळा १४. सोनगड १५. पळसगड १६.भंडारगड १७. नरदुर्ग १८. मार्गगड १९. वसंतगड २०. नंगगड २१. अंकोला २२. खिरदुर्ग (सागरगड) २३. मानगड ८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव ‘आजमगड’ ठेवले. पुढे मराठांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ. स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.
बिनी दरवाजा : पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. आपण नारायणपूर गावातून किल्ल्यावर जातांना हा दरवाजा लागतो. दरवाजा आजही चांगल्या स्थितीत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेक-यांच्या देवडा आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. माचीची एकंदर लांबी एक मैल आहे, तर रुंदी १०० ते १५० फूट आहे. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते त्याचे नाव’पुरंदरेश्र्वर’.
रामेश्र्वर मंदिर : पुरंदरेश्र्वर मंदिराच्या मागील कोप-यात पेशवे घराण्याचे रामेश्र्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिराच्या थोडे वरती गेल्यावर पेशव्यांच्या दुमजली वाडांचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्र्वनाथाने तो बांधला. या वाडातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. वाडाच्या मागे विहीर आहे. आजही ती चांगल्या अवस्थेत आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. आपण प्रथम बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाऊया. यावाटेने वर गेल्यावर १५ मिनिटातच आपण दिल्ली दरवाजापाशी पोहचतो.
खंदकडा : या तीस-या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो हाच तो खंदकडा. या कडाच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत तीस-या दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. वाटेतच आजुबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखाना असल्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाडाचे अवशेष दिसतात. हे सर्व पाहून पुन्हा आपल्या वाटेला लागावे. वाटेवरून पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जातांना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेवरून खाली गेल्यावर केदार दरवाजा लागतो. पडझडी मुळे आज हा दरवाजा वापरात नसला तरी पूर्वी या दरवाजाला फार महत्त्व होते.
पद्मावती तळे : मुरारबाजींच्या पुतळ्या पासून थोडे पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.
शेंद-या बुरूज : पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे त्याचे नाव शेंद-या बुरूज. पुरंदरेश्र्वर मंदिर : हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फूटापर्यंतची मूर्ती आहे. हे मंदिर साधारणपणे हेमाडपंथी धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. दरवाजा ब-यापैकी सुस्थितीत आहे. या दरवाज्यातून आत गेल्यावर उजवी कडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुस-या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात. याशिवाय या भागात बघण्यासारखे काही नाही. आल्या मार्गाने दिल्ली दरवाज्यापाशी यावे. समोरच उजवी कडे असणा-या दरवाज्याने पुढे जावे. येथून पुढे गेल्यावर आणखी एक दरवाजा लागतो. या दरवाज्यावर दोन्ही बाजूस सिंहाच्या प्रतिकृती आढळतात. केदारेश्र्वर : २० मिनिटात केदार दरवाजा पाहून आपण आपल्या मूळ वाटेला लागू शकतो. यावाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायया लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्र्वराच्या मंदिरा पर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्र्वर. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक याच्या दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्र्वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युध भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्र्वर, रोहीडा, मल्हारगड, कहेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे. पुरंदर माची : आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणा-या वाटेने थेट पुढे यावे. म्हणजे आपण माचीवरील भैरवखिंडीत जाऊन पोहचतो. वाटेत वाडांचे अनेक अवशेष दिसतात. भैरवखिंड : याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून चालत गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. सध्या पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.
वीर मुरारबाजी : बिनीदरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच वीर मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे. संपूर्ण गड फिरण्यास एक दिवस लागतो. पुरंदर सोबत वज्रगड देखील पहायचा असल्यास दीड दिवस लागतो.
गडावर जाण्याच्या वाटा : पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
१) पुण्याहून : पुण्याहून ३० कि.मी अंतरावर असणा-या सासवड या गावी यावे. सासवड ते नारायणपूर ही अशी एस.टी सेवा देखील उपलब्ध आहे. नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडी रस्ता थेट किल्ल्या पर्यंत गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील उपलब्ध आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहे. एक म्हणजे गाडी रस्ता. या रस्त्याने गड गाठण्यास २ तास पुरतात तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एक तासात आपण पुरंदर माचीवरच्या बिनीदरवाज्यापाशी पोहचतो
२) सासवडहून : किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट जरा आडमार्गाची आहे. सासवडहून सासवड – भोर गाडी पकडावी. या गाडीने नारायणपूर गावाच्या पुढे असणा-या ‘पुरंदर घाटमाथा’ या थांब्यावर उतरावे. हा घाटमाथा म्हणजे पुरंदर किल्ला आणि समोर असणा-या सूर्यपर्वत यामधील खिंड होय. या थांब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते. ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरंदर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो.
राहण्याची सोय : किल्ल्यावर मिलिटरीचे बंगले आहेत. यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी तेथे असणार्या त्यांच्या ऑफिसरची परवानगी घेणे आवश्यक आहे
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : पायथ्यापासून १ तास.
{मेल फॉरवर्ड} महाराष्ट्र किल्ले पर्यटन वरून घेतलेले आहे
Subscribe to:
Posts (Atom)


